शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
539.25

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
1110

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
1009

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
232

कुटुंब संख्या

🏫
1

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
3

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

मौजे भाटमरळी हे गाव सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात असून तालुक्याच्या पश्चिमेस आशिया महामार्गापासून (शेंद्रे) ५ कि.मी.अंतरावर व सातारा तालुका बस stand पासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावामध्ये प्रामुख्याने बागायती व नगदी पिके (आले,उस,केळी,भाजीपाला)घेतली जातात. शेती व पशुपालन हा गावातील कुटुंबियांचा प्रमुख व्यवसाय आहे.पंचक्रोशीत शेतीच्या ज्यादा उत्पन्नासाठी गाव परिचित आहे.त्यावरूनच "साठ गाव परळी व एकटी भाटमरळी" हि म्हण बोलली जाते. गावामध्ये मंगळाई देवीचे जागृत देवस्थान आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या जोगवा या उत्सवाला दसऱ्याच्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात येतात.